Sat, Apr 20, 2019 17:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत 447 आंदोलकांवर कारवाईचा बडगा

मुंबईत 447 आंदोलकांवर कारवाईचा बडगा

Published On: Jul 26 2018 1:35AM | Last Updated: Jul 26 2018 12:49AMमुंबई : प्रतिनिधी

मराठा क्रांती सकल मोर्चातर्फे शहरात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी तब्बल 447 मराठ्यांची धरपकड करत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील 45 ठिकाणी आंदोलन उग्र होत असताना बुधवारी पोलिसांनी ही कारवाई केली.

सकाळी नऊ वाजल्यापासून शहरात जागोजागी सुरु झालेल्या आंदोलनांदरम्यान बेस्ट बसेसची तोडफोड, गाड्यांचे टायर जाळणे, पुर्व आणि पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर करण्यात आलेला रास्तारोको आणि मानखुर्दमध्ये बेस्टबस पेटविण्यात आल्याने शहरात आंदोलनाला हिंसक वळण लागण्यास सुरुवात झाली. मात्र दुपारी अडीचच्या सुमारास हे आंदोलन मागे घेतल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आणि पोलिसांनी सुटकेचा निश्‍व:स सोडला.

बेस्टबस फोडल्याप्रकरणी आंदोलनकत्यार्ंवर अंधेरीतील साकीनाका पोलीस ठाण्यात 4, कुर्ल्यातील विनोबाभावेनगर पोलीस ठाणे आणि भांडूप पोलीस ठाण्यात प्रत्येकी 2, तसेच अंधेरी, पवई, समतानगर अशा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.