Tue, Nov 20, 2018 23:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कारागृह अधिकार्‍यावरच आरोपीने टाकली विष्ठा

कारागृह अधिकार्‍यावरच आरोपीने टाकली विष्ठा

Published On: Jul 05 2018 1:39AM | Last Updated: Jul 05 2018 1:21AMठाणे : वार्ताहर  

भायखळा कारागृहातील मंजुळा शेटे हत्या प्रकरणाचा  हल्लाबोल झाल्यानंतर कैद्याला बेदम मारहाण करून मानवी विष्ठा खायला लावल्याची कारागृहातील बंदिस्त आमदाराच्या तक्रारीने एकच खळबळ उडवून दिली. सदर प्रकरणाचे पडसाद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात उमटल्याने एकच खळबळ उडाली. कारागृहाबाहेर सुनावणीला आलेल्या आमदाराना चुकीची माहिती अन्य कैद्याने दिल्याने ही तक्रार करण्यात आली. 

दरम्यान या प्रकरणाचा व्हिडीओ कॉन्फरन्स जबाब आणि सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात दिल्याचा दावा ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक वायचळ यांनी केला. याच प्रकरणाची सुनावणी 11 जुलैला मानवाधिकार आयोगापुढे होणार असल्याचे  सांगितले. चोरीच्या गुन्ह्यात बंदिस्त असलेल्या आरोपीला कारागृह पोलिसांनी मारहाण करून मानवी विष्टा खाण्यास दिल्याची तक्रार ठाणे कारागृहात बंदिस्त घोटाळा प्रकरणातील आरोपी आमदार रमेश कदम यांनी मानवाधिकार आयोगाकडे केली. या प्रकरणी मानवाधिकार आयोगाने ठाणे कारागृहाला समन्स पाठविले. 11 जुलै रोजी आयोगासमोर सुनावणी  करण्यात येणार आहे. 

तत्पूर्वी बुधवारी सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाणे कारागृहातील प्रकरण पटलावर आल्याने खळबळ उडाली. याबाबत ठाणे कारागृह अधीक्षक वायचळ यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी 27 जून रोजी कारागृहात चोरीच्या गुन्ह्यात बंदिस्त असलेल्या आरोपीने प्लास्टिक पिशवीतून मानवी विष्ठा आणली आणि नव्या कारागृहाचे सर्कल अधिकारी सचिन चिकने  यांच्या अंगावर फेकली. सदर प्रकरणी कारागृह प्रशासनाने या घटनेबाबत नोंद करून गुन्ह्याबाबत आरोपीचा व्हिडियो कॉन्फरन्स जबाब आणि कारागृहातील सीसी फुटेज न्यायालयात सादर केले असल्याचा दावा केला.