Wed, Apr 24, 2019 12:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रायगड : कारची टेम्पोला धडक, तीन विद्यार्थी ठार

रायगड : कारची टेम्पोला धडक, तीन विद्यार्थी ठार

Published On: Jan 09 2018 4:14PM | Last Updated: Jan 09 2018 4:14PM

बुकमार्क करा
खालापूर : प्रतिनिधी 

लोणावळा येथे सहलीसाठी चाललेल्या वैद्यकीय कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या कारने मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. यात तीन विद्यार्थी ठार तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अनास शेख (वय, १९), स्वेदा दुबे( वय, १९) आणि श्रद्धा मौर्य (वय, १९) अशी अपघातात ठार झालेल्‍यांची नावे आहेत. तर, रिजवान व निलेश (पूर्ण नाव समजले नाही) अशी गंभीर जखमी झालेल्‍यांची नावे आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता खालापूर टोल नाक्याच्या अगोदर धामणी गावानजीक झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला-ठाणे व गोवंडी येथे राहणारे आणि वाशी येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी कारमधून लोणावळा येथे सहलीसाठी निघाले होते.सकाळी साडेनऊच्या सुमारास खालापूर हद्दीत धामणी नजीक पुढे असलेल्या टेम्पोच्या वेगाचा अंदाज न आल्यामुळे पोलो कारने (क्र. आरजे-21-सीबी-833) टेम्‍पोला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. कारमध्ये असलेले अनास आणि स्वेदा यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्‍या श्रद्धाला उपचाराकरिता घेहून जात असताना रस्त्यात तिचा मृत्यू झाला. तर, रिजवान व निलेश गंभीर जखमी झाले. त्‍यांना तातडीने ऊपचाराकरिता एमजीएम कामोठे येथे हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले आहे.