Mon, Mar 25, 2019 18:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुबई–गोवा महामार्गावर अपघात; एक ठार

मुबई–गोवा महामार्गावर अपघात; एक ठार

Published On: Jan 13 2018 3:08PM | Last Updated: Jan 13 2018 3:08PM

बुकमार्क करा
पोलादपूर : प्रतिनिधी 

मुंबई–गोवा महामार्गावर आज पहाटे चारच्या सुमारास पोलादपूर हद्दीतील मौजे चरई फाट्या जवळ अपघात झाला. समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या प्रखर लाईट मुले टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटले. टेम्पो झाडावर आढळून झालेल्या अपघात एकाचा मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी आहे. 

या बाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी, चालक निलेश नारायण महाडिक (वय २७, रा पुरेखुर्द ता खेड जि रत्नागिरी)  आपल्या ताब्यातील टेम्पो (एम एच 08 डब्लू 4708) पनवेलहून खेडला घेऊन जात होता. मौजे चरई फाट्याजवळ रत्नागिरीकडून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने प्रखर लाईट डोळ्यावर मारल्याने टेम्पो चालक महाडिक याचे गाडीवरील नियंत्रण सुटून टेम्पो रस्त्याच्या डाव्या साईडपट्टीवर उतरून रस्त्याच्या खाली जाऊन झाडावर आढळला. यात टेम्पोतील प्रवासी प्रिती शंकर निकम (वय 39) व शंकर अनंत निकम (वय 55 दोघे रा.  किंजळे तर्फे नातू ता. खेड जि रत्नागिरी) जखमी झाले. त्यात शंकर निकम यांचा मृत्यू झाला, तर प्रिती निकम यांच्यावर उपचार सुरू आहेत.