Sat, May 25, 2019 22:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोंझर घाटात एसटी बसला अपघात, १४ प्रवासी जखमी  

कोंझर घाटात एसटी बसला अपघात, १४ प्रवासी जखमी  

Published On: Jul 26 2018 2:50PM | Last Updated: Jul 26 2018 2:50PMमहाड : प्रतिनिधी  

राज्य परिवहन महामंडळाच्या सांदोशी बोरिवली या बसला आज (दि. २६ जुलै)सकाळी पावणे अकराच्या सुमारास कोझर घाटात अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १४ प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात चालकाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याच्या तक्रारी बसमधील प्रवाशांनी केल्या असून, यासंदर्भात संबंधित चालकांविरोधात कारवाई करण्यात येईल असे आगार व्यवस्थापक कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, जखमी प्रवाशांवर बाजारातील आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत.  

महाड आगारातून रोज सुटणारी सांदोशी बोरिवली ही बस (क्र.m h20/ b l 1871)सकाळी दहा वाजता सादोशी गावातून बोरिवलीकडे रवाना झाली होती. पाचाड या गावी या गाडीमध्ये प्रवासी भरल्यानंतर अपघात ठिकाणी येईपर्यंत गाडीतील विद्यार्थी व प्रवाशांनी चालक बनसोडे यांना गाडी वेगात न नेण्याची वारंवार विनंती केली. मात्र, या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्‍यामुळे घाटातील एका वळणावर गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या बाजूच्या शेतामध्ये गेली. यात बसमधील १४ प्रवाशी जखमी झाले आहेत.  

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमी प्रवाशांना पाताळा आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, काही रुग्णांना सोडून देण्यात आले.