Mon, May 20, 2019 18:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कसारा घाटालगत अपघात, दोन महीला ठार 

कसारा घाटालगत अपघात, दोन महीला ठार 

Published On: Aug 20 2018 2:33PM | Last Updated: Aug 20 2018 2:33PMकसारा : प्रतिनिधी

सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटालगतच्या लतिफवाडी गावा जवळ एका भरधाव टँकरने रस्त्या लगत उभ्या असलेल्या कारला धडक दिलेल्‍याने झालेल्‍या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्‍या आहेत. सितापतितिल नारायण कुटी (वय, ६१ ) आणि सुशिला पुल्लयोग सुब्रमंण्यम (वय, ६५ रा.कुर्ला. मुंबई) अशी ठार झालेल्‍या माहिलांची नावे आहेत. 
  
मुंबईहून नाशिककडे निघालेली कार (क्रमांक MH 02 EP 9119) लतिफवाडी जवळ एका ढाब्यावर चहापाणी घेण्यासाठी थांबली असता गाडी बाहेर ऊभे राहून सतीपतितिल कुटी आणि सुशिला सुब्रमंण्यम या चहा पित असता मुंबईहून नाशिककडे जाणारा टँकर ( GJ.12.AZ.6051) भरधाव वेगात असल्याने टँकर चालकाचा ताबा सुटला व टँकरने कारला धडक देऊन उभ्या असलेल्या दोन्ही महिलांनाही धडक दिली आणि त्यांना ५० फुट अंतर फरफडत नेले. महिलांना फरफडत नेल्या नंतर पुढे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका बोलेरो पिकअपला धडकला. या विचित्र आपघातात सितापतितिल आणि सुशिला यांचा जागीच मृत्‍यू झाला तर, अन्य दोघे जण जखमी झाले. जखमी दोघांना तात्‍काळ जवळच्या रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, या विचित्र आपघाताची माहीती मिळताच आपत्ती व्यवस्थापन गृपचे सदस्य पिक इनफ्रा पेट्रोलींगचे सदस्य तत्काळ घटणास्थळी पोहचले व मदत कार्य सुरू केली. घटनेची माहिती मिळताच कसारा पोलिस व महामार्गावरील पोलिसांनी घटणास्थळी धाव घेतली. 

याप्रकरणी कसारा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुंदण जाधव, पोलिस उपनिरीक्षक डगळे पुढील तपास करित आहेत.  

आपघाती क्षेत्राकडे ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष 
कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेला लतिफवाडी परिसर हा आपघाती क्षेत्र असून, या ठिकाणी वर्ष भरात अत्ता पर्यंत आठ बळी गेले आहेत तर पंन्नास हून अधिक जखमी झाले  आहेत. या क्षेत्रात पांढरे पट्टे तसेच रगिबीरंगी स्पीडब्रेकर लावण्यासाठी अनेकदा तक्रारी करुन देखील पिक इनफ्राचे प्रोजेक्ट मॅनेजर अनिरुद्ध सिंग या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नाहीत.