होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टँकरच्या चाकाखाली येऊन चिमुकल्याचा मृत्‍यू 

टँकरच्या चाकाखाली येऊन चिमुकल्याचा मृत्‍यू 

Published On: Jun 02 2018 9:18PM | Last Updated: Jun 02 2018 9:18PMकल्याण : वार्ताहर

कल्याण शिवाजी चौक परिसरात आज (दि. २ जून)सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पती -पत्नी आपल्या आठ वर्षाच्या मुलासह दुचाकीने जात होते. अचानक तोल गेल्याने दुचाकी घसरली आणि बाजूने जात असलेल्या टँकरच्या चाकाखाली गेली. या अपघातात आठ वर्षाच्या चिमुकल्‍याचा जागीच मृत्यू झाला.  आरोह महेश आठराळे असे मृत्‍यू झालेल्‍या मुलाचे नाव आहे. 

कल्याण पश्चिम येथील टावरी पाडा येथे राहणारे महेश आठराळे आपल्या दुचाकीने पत्नी आणि मुलगा आरोहसह शिवाजी चौक येथून आग्रा रोड चौक दिशेने जात होते.या वेळी या ठिकाणी रस्ता उंच सखल असल्याने त्यांचा  तोल गेला आणि ते खाली पडले.  यावेची आरोह पाठीमागून येणाऱ्या टँकरच्या चाकाखाली आला गेला. या अपघातात त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला.