होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा

अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा

Published On: Jan 13 2018 4:00PM | Last Updated: Jan 13 2018 4:05PM

बुकमार्क करा
मुंबईः पुढारी ऑनलाईन

राज्यात आज विविध ठिकाणी झालेल्या अपघातात एकूण १२ जणांचा मृत्यू झाला तर ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी खरोखरच अपघात दिवस ठरला. 

पहिला मोठा अपघात रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडला. सांगली जिल्‍ह्यातील कडेगाव वांगी येथे उसाचा ट्रॅक्‍टर आणि क्रूझर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ६ पैलवान ठार झाले. तर इतर ६ जण गंभीर जखमी झाले. या एकाच अपघातात महाराष्ट्राने ६ तरूण पैलवानांना गमावले.

त्यानंतरची दुसरी दुर्घटना म्हणजे डहाणूमध्ये (पालघर) विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटल्याने झालेल्या अपघातात ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या बोटीत पालघर जिल्‍ह्यातील के. एल. पोंडा हायस्‍कूलचे ४० विद्यार्थी होते. त्यातील ३२ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. आणखीन ८ जणांचा शोध सुरू आहे.

तिसरी घटना मुंबई–गोवा महामार्गावर आज पहाटे चारच्या सुमारास घडली. पोलादपूर हद्दीतील मौजे चरई फाट्याजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या प्रखर लाईट मुळे टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटले. टेम्पो झाडावर आढळून झालेल्या अपघात एकाचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली.    

ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडच्या (ओनजीसी) एका हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला असून, त्यात सात प्रवासी आहेत. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरून हेलिकॉप्टर बेपत्ता झाले आहे. हेलिकॉप्टरचे अवशेष डहाणू परिसरात समुद्रात सापडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या अपघातात हेलिकॉप्टरमधील लोक सुरक्षित आहेत कि, नाहीत याची माहिती मिळालेली नाही.

अपघाताच्या बातम्याः-

सांगलीतील अपघाताने महाराष्‍ट्र हळहळला; ६ पैलवानांचा मृत्यू

डहाणू : बुडालेले ३६ विद्यार्थी सुखरूप ; ४ जणांचा मृत्यू

मुबई–गोवा महामार्गावर अपघात; एक ठार

मुंबई : ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरचे डहाणूत अवशेष