Thu, Sep 20, 2018 10:39



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अपघात विरहित डोंबिवलीसाठी कामा सज्ज !

अपघात विरहित डोंबिवलीसाठी कामा सज्ज !

Published On: May 23 2018 5:11PM | Last Updated: May 23 2018 5:11PM



डोंबिवली : वार्ताहर

औद्योगिक विभागात 26 मे 2016 मध्ये प्रोबेस कंपनीत महाभयनाक स्फोट झाल्याने डोंबिवली परिसर हादरुन गेला होता. या घटनेला शनिवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या स्फोटामुळे उद्योजक खडबडून जागे झाले असून 'कामा' या उद्योजकांच्या संघटनेने औद्योगिक सुरक्षा, कामगार सुरक्षा व डोंबिवलीकरांची सुरक्षाआदी गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्‍यासाठी ''अपघात विरहित डोंबिवली औद्योगिक विभाग'' तयार करण्याचे  ध्येय निश्चित केले आहे. यासाठी नवीन योजना अंमलात आणली जाणार असून, ज्यात रसायन मिक्सिंग व त्याचा उत्कलन बिंदू मर्यादा स्थिर करण्यात येणार आहे. यामुळे रसायन निर्मिती करताना कोणतेही अपघात घडणार नाही असे उपकरण सामाईक तत्वावर बसवण्यात येणार आहे.

डोंबिवली औद्योगिक विभागात 145  रासायनिक कपंन्या, 80 कापड प्रिक्रिया उद्योग आणि 125 इंजिनियरींग असे सुमारे 350 उद्योग कार्यरत आहेत. नव्या उपकरणा संदर्भात माहिती देताना 'कामा 'संघटनेचे कार्यवाह देवेन सोनी व माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी म्हणाले, प्रोबेस कपंनीत स्फोट झाल्यानतंर 'डीश ''मार्ग'', सी.ई.टी.पी.व कामा यांनी एकत्र येऊन चर्चा केली. तसेच गेली दोन वर्षे उद्योजक कामगार यांचे प्रिशक्षण घेण्यात आले. त्यातून अपघात विरहित डोंबिवली औद्योगिक विभाग बनवण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले. यासाठी नवीन योजना अंमलात आणली जाणार असून ज्यात रसायन मिक्सींग व त्याचा उत्कलन बिंदू हे सेट करण्यात येणार आहे. सामाईक तत्वावर हे उपकरण बसवण्यात येणार असून या उपक्रमासाठी सुमारे 6 ते 7 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सर्वाच्या सहभागाने व सुरक्षेशी निगडीत असल्याचे सर्वांना त्याचा फायदा होणार आहे असेही त्यानी सांगीतले.

तर श्रीकांत जोशी म्हणाले, उद्योजक आपली जबाबदार पार पाडत असताना उद्योजकांचीही शासनाकडून अपेक्षा असून औद्योगिक विभागातील रस्त्यांची दयनीय अवस्था असून कचरा उचलला जात नाही, दिवाबत्ती नाही, सुसज्ज रुग्णालय नाही याकडे तातडीने प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फेाटाने मालमत्तांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेच शिवाय १२ जणांचे प्राण गेले आहेत तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. यामुळे उद्योजक खडबडून जागे झाले असून येत्या वर्षभरात नवीन योजना अंमलात आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.