Mon, Aug 19, 2019 01:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना इंद्रियसुखाचे धडे!

महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना इंद्रियसुखाचे धडे!

Published On: Feb 15 2018 9:51AM | Last Updated: Feb 15 2018 9:53AMमुंबई : प्रतिनिधी

पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या अवांतर पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकुरांचा उल्लेख असून, राज्य सरकार लहान मुलांवर असे संस्कार करत आहे. सरकारने या पुस्तकांचे वितरण तातडीने थांबवावे, अशी मागणी करत सातत्याने वादग्रस्त निर्णय घेणारा शिक्षण विभाग हा एक विनोद झाला असल्याची बोचरी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी केली.

पुण्यातील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत विखे-पाटील यांनी शिक्षण विभागावर टीका करताना तावडे यांच्यावर तुफान टोलेबाजी करत ते केवळ चमको असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारकडून अवांतर वाचन या उपक्रमांतर्गत पुस्तके खरेदी केली जातात. त्यामध्ये सत्यकथा व ऐतिहासिक पुस्तकांचा प्रामुख्याने समावेश असतो. सरकारने या पुस्तकांमध्ये धार्मिक आणि पौराणिक पुस्तकांचाही समावेश केला आहे. यातील पुस्तकांमध्ये कौमार्यभंग, विषयलोलुपता, इंद्रियसुख आदी आक्षेपार्ह उल्लेख आहेत. सरकार राज्यातील लहान मुलांवर हे संस्कार करणार आहे का, सरकारने या पुस्तकांंचे वितरण तातडीने थांबवावे, अशी मागणी विखे-पाटील यांनी यावेळी केली. खरे तर ही पुस्तके वाचली तर त्यातली भाषा ही शालेय विद्यार्थ्यांना झेपणारी अजिबात वाटत नाही. त्यामुळे या पुस्तकांना आणि त्यातल्या मजकुराला हिरवा कंदील कुणी दिला, हा प्रश्‍न आहे. 

वाचा : बाल नचिकेतातील मजकुरांचे खापर समितीवर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित प्रकाशन भारतीय विचार साधना यांचे जे पुस्तक 20 रुपयाला उपलब्ध आहे, तेच पुस्तक सरकारने चक्‍क 50 रुपयांत खरेदी केले असून, या प्रकाशनाकडून तब्बल 8 कोटी 17 लाख रुपयांची खरेदी करण्यात आली, असा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.

काय आहेत पुस्तकातील वाक्ये
> देवी! नग्‍न होऊन तू आम्हास भोजन द्यावे!
> विवाह न करता इंद्रियसुख!
> तिचे सौंदर्य पाहून ऋषींचे चित्त चंचल झाले
> त्यांच्यात कामवासनेचा प्रादुर्भाव झाला!
> कौमार्यभंग झाल्याने मला कोण स्वीकारेल?

Image may contain: text