Sat, Jul 20, 2019 08:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पासष्ट लाखाचे दागिने लुटणारा फरारी आरोपी अटकेत 

पासष्ट लाखाचे दागिने लुटणारा फरारी आरोपी अटकेत 

Published On: May 25 2018 7:15PM | Last Updated: May 25 2018 7:15PMऐरोली : प्रतिनिधी 

कामोठा येथील ज्वेलर्सच्या दुकानात घुसुन मालकावर हल्ला करत चोरट्याने सुमारे पासष्ट लाखाचे दागिने लंपास केले होते. या फरारी आरोपीस आज (शुक्रवार) नवी मुंबई खंडणी विरोध पथकाने अटक केली. शहनवाज अब्दुल जब्बार मंन्सुरी (वय - २२), आणि मदनसिंह जोहरसिंह खरवड (वय - २७ दोघेही रा. चिता कॅम्प टॉम्बे ) असे या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संजय भोपीलाल जैन यांचे कामोठे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये न्यु बालाजी नावाने ज्वेलरीचे दुकान आहे. १७ मे ला रात्री आरोपी अब्दुल जब्बार मंन्सुरी व मदनसिंह जोहरसिंह खरवड हे खरेदीच्या बहाण्याने दुकानात आले होते. तर जैन यांच्यावर सत्तुरीने वार करत ज्वेलरीचे शटर बंद करून दुकांनातील ६५ लाख रुपये किंमतीचे २ किलो सोन्यांचे दागिने व १ लाख रुपये किंमतीचे रोख रक्कम असा ऐवज लंपास केला होता.  

जैन यांनी कामोठी पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार दिली होती. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना खंडणी विरोधी पथकाचे  पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे  टॉम्बे मधून आरोपीचा शोध घेण्यात आला. यावेळी टॉम्बे परिसरातून पोलिसांनी आरोपीना अटक केली. तर त्यांच्याकडून  किमती दागिने जप्त केले.