Tue, Nov 20, 2018 01:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभय कुरूंदकरना पोलिस ठाण्यात सरकारी जेवण  

अभय कुरूंदकरना पोलिस ठाण्यात सरकारी जेवण  

Published On: Dec 08 2017 8:30PM | Last Updated: Dec 08 2017 8:35PM

बुकमार्क करा

नवी मुंबई : प्रतिनिधी 

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक अभय करुंदकरला आज पनवेल न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची रवानगी कंळबोली पोलीस ठाण्याच्या कोठडीत करण्यात आली असून त्याला इतर सामान्य आरोपींच्याप्रमाणे सरकारी जेवणाचा पाहुणचार दिला जात आहे.

न्यायालयातून आणल्यानंतर लगेच पीआय कुरूंदकरला तपास अधिका-यांनी पोलीस कोठडी दाखवली. नेहमीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीप्रमाणेच त्याला शासकीय जेवण देण्यात येत असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्याची लॉकअप रजिस्टरला पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत तशी नोंद घेण्याचे आदेश तपास अधिकारी यांनी दिले. त्याच्या लॉकअप बाहेर शस्त्रधारी गार्ड तैनात केले असून, त्या गार्डसाठी नियुक्त केलेल्या अमलदारांना सक्त सुचना देण्यात आल्या आहेत. सर्व सामान्य आरोपींना ज्या पध्दतीने कोठडीत ठेवले जाते त्याच पध्दतीने कुरूंदकरला ही ठेवले आहे. झोपण्यासाठी सत्रंजी दिल्याचे पोलीसांनी सांगितले. त्याला सामान्य आरोपींप्रमाणे कोठडीत ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.  

या प्रकरणाचा तपास करणारे एसीपी प्रकाश निलेवाड आज संध्याकाळी बाहेरगावी गेल्याने त्याचा चार्ज एसीपी राजकुमार चाफेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.  त्यामुळे या प्रकरणाची चौकशी ही आता एसीपी राजकुमार चाफेकर करणार आहेत.