Fri, Feb 22, 2019 15:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वेचे महाव्यवस्थापक यांचे मराठमोळ्या लेझीम पथकाने स्वागत

रेल्वेचे महाव्यवस्थापक यांचे मराठमोळ्या लेझीम पथकाने स्वागत

Published On: Feb 04 2018 6:42PM | Last Updated: Feb 04 2018 6:37PMठाणे : अमोल कदम

आसनगाव रेल्वे स्थानक हरित स्थानक होणार यामुळे या रेल्वे स्थानकाच्या पाहणी करिता रेल्वेचे महाव्यवस्थापक डि.के.शर्मा आले होते. त्यावेळी कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मराठमोळ्या संस्कृतीप्रमाणे लेझीम पथकाने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आसनगाव हरित स्टेशनच्या सोलर पॅनलचे, एक रेल्वे कर्मचारांसाठी बगिचा, मुख्य बगिचा याचे त्यांनी उदघाटन केले.

आसनगाव ते मुंबई सिसएममटी पर्यंत प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवेदन शर्मा याना कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने देण्यात आले.