होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महात्मा फुलेंच्या गावात आमीर खान

महात्मा फुलेंच्या गावात आमीर खान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात दुष्काळ निर्मुलनाचे काम करणारा अभिनेता आमीर खान आता महात्मा जोतिबा फुले यांच्या कटगुन गावात पोहोचला आहे. गावातून फेसबुक लाईव्ह करत त्याने पाणी फाउंडेशन करत असलेल्या कामाची माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांत सत्यमेव जयते हा आमीरचा कार्यक्रम टीव्हीवर येत नसल्याने त्याविषयी आमीरकडे तक्रारी झाल्या होत्या. पण, सत्यमेव जयतेची संपूर्ण टिम या दुष्काळ निर्मुलनाच्या कामात लागल्याने शो बंद असल्याचे आमीरने फेसबुक लाईव्हमधून स्पष्ट केले आहे. 

तर या लाईव्ह दरम्यान आमीरने दुष्काळावर मात करण्यासाठी लोकांनी जल मित्र बनावे असे आव्हान देखील केले. त्याचबरोबर महाराष्ट्र दिनच्या निमित्याने महाराष्ट्रातील दुष्काळी भागात श्रमदान करावे असे देखील आमीर म्हणाला. तर पाणी फाउंडेशनच्या वेबसाईटवर नोंदणी करण्याचे देखील आव्हान केले.  

याचबरोबर फेसबुक लाईव्हमध्ये आमीरने पाणी फाउंडेशनच्या कामाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

 

Tags : aamir khan, facebook , facebook live, jyotiba phule village,


  •