होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुकेश अंबानी यांच्या मुलाचे हटके वेडिंग कार्ड (Video Viral)

मुकेश अंबानी यांच्या मुलाचे हटके वेडिंग कार्ड (Video Viral)

Published On: Jun 12 2018 4:49PM | Last Updated: Jun 12 2018 4:55PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याचा विवाह हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहतासोबत  होणार आहे. मध्यंतरी त्यांच्या गोव्यात झालेल्या  प्री एंगेजमेंट शूटचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चा जोरदार सर्वत्र सुरू आहे. त्यांच्या  प्री एंगेजमेंट शुटचे फोटो नंतर वेडिंग कार्ड चे काही व्हिडिओज व्हायरल झाले आहे. 

आकाश अंबानीचे वेडिंग कार्ड हे सर्वांच्या भुवया उंचवण्यासारखे आहे. सध्या त्यांच्या वेडिंग कार्डचे काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत. या वेडिंग कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे हे कार्ड एखाद्या खजिनाच्या पेटी सारखे असुन त्याला काचेचा दरवाजा लावण्यात आला आहे. या पेटीत मध्ये आमंत्रण पत्रिकेसोबत श्री गणेशाची मूर्ती भेट देण्यात आली आहे. या पत्रिकेची किंमत जवळपास दीड लाख असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रथम पत्रिका सिद्धिविनायकाच्या चरणी वाहण्यासाठी अंबानी परिवाराने मुंबईतील सिद्धीविनायकाच्या मंदिराला भेट दिली.