Mon, Mar 18, 2019 19:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुभेदारच्या बँकखात्यात ‘शून्य’ बॅलन्स!

सुभेदारच्या बँकखात्यात ‘शून्य’ बॅलन्स!

Published On: Mar 01 2018 1:32AM | Last Updated: Mar 01 2018 1:18AMनवी मुंबई: राजेंद्र पाटील 

तीन राज्यातील सुमारे 500 तरुणांची 13 कोटींची फसवणूक करणार्‍या आणि सैन्यदलातून फरार असलेला सुभेदार हसन्नोद्दिन चाँदभाई शेख याच्या नगर जिल्ह्यांतील वाळकी येथील राहत्या घराची जळगाव पोलीसांच्या पथकाने झाडाझडती घेतली. त्याठिकाणी एक इनोव्हा कार, एअर पिस्टल, बंदुक, सहा काडतुसे आणि पैशांची नोंद असलेली एक डायरीसह  बँकेची कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली.  विशेष म्हणजे सुभेदारच्या बँक खात्यात एकही रुपया शिल्लक नसल्याची नोंद पोलिसांना आढळून आल्याने तपास पथकही अवाक झाले. यामुळे त्याची असलेली मालमत्ता बेनामी असण्याची शक्यता पाचोरा पोलीस निरिक्षक  श्यामकांत सोमवंशी यांनी वर्तवली आहे. 

बुधवारी सुभेदार शेखसह त्यांच्या पत्नी अअणि मुलाची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पत्नी व मुलांची रवानगी न्यायालयीन कोठडी केली तर शेखच्या पोलीस कोठडीत  पुन्हा 8 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली. शेखने वाळकी आणि नगरमधील काही खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे काढले होते. त्यापोटी त्याने आतापर्यंत साडेचार कोटी रुपये व्याजाच्या स्वरुपात सावकारांना परत केल्याची माहिती पुढे आली. खेडेगावातील मुलांचा गोळा केलेला पैसा हा खाजगी सावकर्‍यांच्या घशात शेखने कोंबला.  महाराष्ट्रातील खान्देशातील जळगाव जिल्ह्यांतील 350 बेरोजगारांची सैन्यदलात नोकरी लावून देतो सांगून फसवणूक करणार्‍या  फरार सुभेदाराला पाचोरा पोलीसांनी मुलगा, पत्नीसह बेड्या ठोकल्या होत्या. पोलीस कोठडीत चौकशी केली असता त्याने अनेक महत्वाच्या बाबी उघड केल्या असून तपासाच्या दृष्टीने त्या आता उघड करणे शक्य नसल्याचे तपास अधिकारी सांगतात. राजस्थान, पंजाब, महाराष्ट्रातील 500 हून अधिक बेरोजगार तरुणांना सैन्यदलात भरती करण्यासाठी 12 ते 13 कोटींना या भमाट्याने चुना लावल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.