Fri, Nov 16, 2018 21:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केंद्रप्रमुखांची पदे आता स्पर्धा परीक्षेद्वारे भरणार!

केंद्रप्रमुखांची पदे आता स्पर्धा परीक्षेद्वारे भरणार!

Published On: Feb 17 2018 9:37AM | Last Updated: Feb 17 2018 9:37AMमुंबई : प्रतिनिधी 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेली केंद्रप्रमुखांची रिक्‍त पदे यापुढे आता सरळसेवा, विभागीय मर्यादित स्पर्धात तसेच पदोन्‍नतीने भरली जाणार आहेत. ही पदे भरण्याची कार्यपद्धती शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी एका शासन निर्णयातून स्पष्ट केली आहे. त्यामुळे सरसकट होणार्‍या या पदांच्या भरतीला आता चाप बसणार आहे.

राज्यभरातील जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळा मोठ्या संख्येने आहेत. यामधील 4860 केंद्रशाळा आहेत. शाळांवर नियंत्रणासाठी राज्य शासनाने केंद्रप्रमुखांची पदे निर्माण केली. मात्र, ही पदे पदोन्नतीने भरण्यात  येत असल्याने त्यांना न्याय मिळत नसल्याचे निरीक्षण आहे.  

शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

आता 40:30:30 या प्रमाणात भरली जाणार आहेत.  आता केवळ 30 टक्के पदेच पदोन्नतीने भरली जाणार असून यामधील 30 टक्के स्पर्धा परीक्षेद्वारे आणि 30 टक्के सरळसेवा पद्धतीने भरली जातील. पदोन्‍नतीने भरली जाणारी 30 टक्के पदेही जिल्हा परिषदेच्या  प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) पदावर तीन वर्षे अखंड सेवा झालेल्या शिक्षकांमधून सेवाजेष्ठेतेनुसार भरण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.