Thu, Jun 20, 2019 01:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्यार्थी परिषदेवर युवासेनेचे वर्चस्व

विद्यार्थी परिषदेवर युवासेनेचे वर्चस्व

Published On: Feb 27 2018 1:59AM | Last Updated: Feb 27 2018 1:02AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत युवा सेना पुरस्कृत सानिया नाघुठणे हिने अभाविपच्या सूरज यादव याचा पराभव केला. तर सचिवपदी युवासेनेच्या ग्रॅविल गोन्सालवीस या विद्यार्थींनीची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन सदस्यामुळे युवासेनेचे सिनेटचे संख्याबळ वाढणार आहे.  

निवडणून येणार्‍या विद्यार्थ्यांना केवळ दोन महिन्याचा कालावधी मिळणार असल्याने ही निवडणुक रद्द करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. या मागणीकडे दुर्लक्ष करत विद्यापीठाने या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. अखेर निवडणूक जाहीर झाल्याने विद्यार्थी संघटनात चुरस झाली. युवा सेना आणि अभाविप आमने सामने येत या निवडणूकीची रंगत वाढली. सोमवारी झालेल्या या निवडणुकीत 13 विद्यापीठ प्रतिनिधींनी मतदान केले. त्यापैकी युवा सेनेच्या सानिया हिला एकूण 10 मते मिळाली. तर अभाविपचा सूरज यांना दोन मते मिळाली. तर एक मत बाद झाले. सचिव पदावर याआधीच युवासेनेचे ग्रॅविल गोन्सालवीस यांची बिनविरोध निवड झाली आहे. हे दोघे मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून नेतृत्व करणार आहेत.

या निवडणूकीनंतर युवासेनच्या विजयी उमेदवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. मंत्र्यांनी बैठक घेऊन ही निवडणूक घेणार नाही, असे सांगितले होते, तरी अभाविपने निवडणूक अर्ज भरला. अवघा एक तास असताना या फसवणुकीविरोधात आम्ही अर्ज भरले आणि निवडून आलो.असे अदित्य ठाकरे म्हणाले. या निवडणूकीत शिक्षणमंत्री विनोद तावडे अप्रत्यक्षपणे अभाविपला मदत केली असा आरोपही युवासेनेने केला.