Tue, Mar 19, 2019 20:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाकाबंदीला घाबरला अन् जीवाला मुकला!

नाकाबंदीला घाबरला अन् जीवाला मुकला!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई: प्रतिनिधी

शनिवारी रात्री वांद्रे रेक्लमेशन परिसरात नाकाबंदीला घाबरलेल्या 17 वर्षीय तरुणाचा दुचाकीवरून रस्त्यावर कोसळून मृत्यू झाला. यावेळी जखमी झालेल्या अन्य एका तरुणाने पोलिसांनी मारहाण केल्याने दुचाकी घसरली आणि अपघात झाल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी मात्र आरोपाचे खंडन केले आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपघाताची नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे.

यातील दुचाकीचालक 17 वर्षीय युवक धारावीतील 90 फिट रोडवर राहतो. शनिवारी रात्री तो भावाची दुचाकी घेऊन दोन मित्रांसह ट्रिपल सीट निघाला होता.वांद्रे रिक्लेमेशन परिसरात रस्त्यावरील नाकाबंदी पाहून तो घाबरला. त्याने मागे बसलेल्यांपैकी एका मित्राला उतरण्यास सांगितले. नंतर दुचाकी पुढे नेत असताना त्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. याचवेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटून तो खाली पडला.

जखमी इम्रानला पोलिसांनी भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही माहिती नंतर त्याच्या पालकांना देण्यात आली. इम्रान हुशार होता. त्याचा स्वतःचा व्यवसाय होता. बाईकवरुन जाताना एका पोलिसाने त्याच्या दिशेने काठी फेकून मारल्याने त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि अपघातात झाला,असा आरोप केला जात आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पोलीस करत आहेत.

बॅरिकेटला धडकून मृत्यू

रस्त्यावरील बॅरिकेटला धडक बसून 50 वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू झाला. मोहम्मद अन्सारी असे मृताचे नाव असून रोड कंत्राटाराविरुद्ध सायन पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजता किंग्ज सर्कल रेल्वे ब्रिजजवळ डॉ. बी. ए. रोडवरील गांधी मार्केटसमोर झाला. मदनपुर्‍यात साकली स्ट्रिटवर आयशा अपार्टमेंटमध्ये मोहम्मद राहत होते. शुक्रवारी ते बाईकवरुन सायन परिसरातून निघाले असता तेथे रस्त्याच्या कामासाठी लावलेल्या बॅरिकेटला दुचाकीची धडक बसली. त्यांना पोलिसांनी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

Tags : Police CheckPoints, Mumbai, Youth Dies


  •