गोवंडीत माथेफिरूच्या चाकूहल्ल्यात तरुणाचा मृत्यू

Last Updated: Oct 11 2019 2:02AM
Responsive image

Responsive image

गोवंडी : वार्ताहर 

पूर्ववैमनस्यातून शेजारी राहणार्‍या महिलेवर चाकूने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात घडली. या हल्लेखोराला पोलीस पकडून घेऊन जात असताना त्याने पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेत बाजारपेठेतील आणखी पाचजणांवर हल्ला केला. या हल्ल्यात जयेश गुप्ता (20) हा तरुण ठार झाला. तर मेहमुना रझाक शेख या गंभीर जखमी झाल्या. अन्य जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

शिवाजीनगर येथील रस्ते क्रमांक 8, प्लॉट क्र. 4 येथे राहणारा आरोपी अरविंद यादव (32) याचे त्याच्या शेजारी राहणार्‍या मेहमुना रझाक शेख यांच्याशी वाद होता. गुरुवारी त्या भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी जात असताना अरविंद त्यांच्या पाठीमागून आला आणि त्याने आपल्या हातातील सुर्‍याने शेख यांच्या गळ्यावर वार केले. हा प्रकार पाहताच बाजारातील विक्रेत्यांनी त्याला पकडून पोलिसांना कळवले. 

काही वेळातच शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी अरविंदला ताब्यात घेऊन गाडीत बसवले. मात्र, अरविंदने पोलिसांच्या ताब्यातून सुटका करून घेत गाडीतून बाहेर उडी घेतली. बाजाराच्या दिशेनेे धावत असताना त्याने हातातील धारदार सुर्‍याने बाजारातील 5 जणांवर हल्ला केला. अखेर नागरिकांनी त्याला पुन्हा पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमींना गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले.

जखमींमधील जयेश गुप्ता या तरुणाच्या छातीत अरविंदने चाकू खुपसल्याने गंभीर जखमी झालेल्या जयेशचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी शेख यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सायन येथील टिळक रुग्णालयात तर, अन्य जखमींवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, अरविंदला पकडल्यानंतर पोलिसांनी दाखवलेल्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आणि अन्य पाचजण जखमी झाले. त्यामुळे अरविंदसह संबंधित  पोलिसांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जखमी आणि मृताचा नातेवाईकांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच लोकांनी शताब्दी रुग्णालयात धाव घेत पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन करत आरोपी यादवला अटक केली आहे. मृत जयेश गुप्ता हा चार दिवसांपूर्वी आजमगडहून आपल्या वडिलांकडे मुंबईत आला होता. त्याचे वडील राजेश गुप्ता हे चेंबूरच्या आनंद नगरात राहतात. ते रिक्षा चालवतात. घटना घडली त्यावेळी ते त्याच्या सोबत होते. खरेदीसाठी ते जयेशला घेऊन शिवाजीनगर बाजारात आले होते. त्याचवेळी पोलिसांच्या ताब्यातून सुटून आरोपी अरविंदने लोकांवर अंदाधुंद चाकूने हल्ला करायला सुरुवात केली. घाबरलेले लोक सैरावैरा पळत असताना अरविंदने जयेशच्या छातीत चाकू भोसकला. गंभीर जखमी जयेशला गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.चिदंबरम पिता-पुत्रांच्या अडचणीत मोठी वाढ; सीबीआयकडून आरोपपत्र दाखल


उत्तर प्रदेशात हत्या सत्र सुरूच; हिंदू महासभेच्या कमलेश तिवारींची निर्घृण हत्‍या


नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी


'सॅटेलाइट शंकर' ट्रेलर लॉन्च


इचलकरंजीत २ कोटी ७२ लाख ५० हजारांची रोकड पकडली


स्‍ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवा : धनंजय मुंडेंची मागणी


बेकायदेशीररित्या अमेरिकेत जाण्याचा ३२५ भारतीयांचा प्रयत्न; मेक्सिकोतून पाठवले परत 


चोरुन जेवणे विद्यार्थ्यास पडले महागात


कोल्हापूर : ऋतुराज पाटलांच्या प्रचारासाठी ज्योतिरादित्य शिंदेंचा मराठीतून संवाद  


रंजन गोगोई यांच्‍या निवृत्तीनंतर मराठी माणूस होणार सरन्यायाधीश?