होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवली : मामेभावाकडून तरुणीचे लैंगिक शोषण

डोंबिवली : मामेभावाकडून तरुणीचे लैंगिक शोषण

Published On: Feb 27 2018 4:54PM | Last Updated: Feb 27 2018 4:54PMडोंबिवली : वार्ताहर

मामेभावाने लैगिक शोषण झाल्याची तक्रार खडकपाडा पोलिस ठाण्यात तरुणीने केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून वांरवार बलात्कार केल्याची तक्रार मुलीने दिल्यानंतर मामाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजताच आरोपीचे फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीचे नाव विशाल गायकवाड असे आहे. तो बिड जिल्ह्यातील गेवराई येथे राहतो. तर पिडीत तरुणी आपल्या नातेवाईकांसह कल्याण-कसारा मार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या मोहने परिसरात राहते. ती एका महाविद्यालय शिक्षण घेत आहे. आरोपी विशाल हा तिच्या मामाचा मुलगा असल्याने त्याचे घरी ये-जा होत असे, याच दरम्यान पिडीत तरुणीला आरोपी विशालने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर काही महिन्यांनी तिला लग्नाचे आमिष  दाखवले. ती राहत असलेल्या घरातच तिच्यावर वांरवार बलात्कार केला. दरम्यानच्या काळात पिडीत तरुणीने आरोपीकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र, त्याने लग्नास नकार दिला. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पिडीत तरुणीच्या लक्षात आल्याने तिने नातेवाईकांसह खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरु केला आहे. अधिक तपास महिला साह्य्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. पवार करीत आहेत.