Wed, May 22, 2019 22:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मरीन ड्राईव्हवर भररस्त्यात युगुलाचे अश्‍लील चाळे

मरीन ड्राईव्हवर भररस्त्यात युगुलाचे अश्‍लील चाळे

Published On: Jun 10 2018 10:33AM | Last Updated: Jun 10 2018 10:33AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे एका युगुलाने रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकावर बसून अश्लिल चाळे केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यांचे हे चाळे येणारे जाणारे पाहत होते, मात्र याचे त्यांना भानही राहिले नव्हते. त्यांच्या या कृत्याला कुणीतरी कॅमेर्‍यात कैद करून त्याचा व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणात पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे. तर महिलेसोबत अश्लिल चाळे करणारा तरुण हा परदेशी असून त्याचा शोध सुरू आहे.

शुक्रवारी सकाळी मरीन ड्राईव्ह येथे रस्त्यामधील दुभाजकावर बसून एक युगुल अश्लिल चाळे करत होते. मरीन ड्राईव्हला समुद्र किनारी प्रेमी युगुल अनेकदा दिसतात. पण रस्त्याच्या मधोमध हा प्रकार सुरू असल्याने उपस्थितांचे लक्ष त्या युगुलाकडे वेधले जात होते. काही मंडळींनी मोबाईलमध्ये हा सर्व प्रकार कैद केला. युगुलाचे चाळे सुरू होताच काही मिनिटांमध्येच तिथे पोलिसांचे गस्ती पथक पोहोचले. पोलिसांना बघून त्या युगुलाने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तर तिच्यासोबत अश्लिल चाळे करणारा परदेशी तरुण तिथून पळून गेला.

तरुणी मनोरुग्ण? 
महिलेला मानसिक आजार असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. महिला पोलिसांच्या प्रश्नाला उत्तर देणे टाळत होती. सुरुवातीला  तिने गोव्यातून आल्याचे सांगितले. मुंबई पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधला. पण महिलेबाबत माहिती मिळू शकली नाही. तिचे वागणे आणि बोलणे विचित्र असून तिला मानसिक आजार असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महिलेची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. महिलेसोबत अश्लील चाळे करणार्‍या परदेशी तरुणाचाही पोलिसांनी शोध सुरू केला आहे.