होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नकली नोटा चलनात आणणार्‍या महिलांना बेड्या

नकली नोटा चलनात आणणार्‍या महिलांना बेड्या

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 02 2018 1:33AMटिटवाळा : प्रतिनिधी

भाजी, समोसे, अंडी यांसारख्या लहान मोठ्या वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने नकली नोटा चालवणार्‍या दोन महिलांना टिटवाळा पोलिसांनी गजाआड केले आहे. गणपती मंदिर रोडवरील मुख्य बाजारपेठेतील डीलक्स हॉटेलजवळ असलेल्या एका भाजीवाल्याकडे व दुकानदाराकडे सना सलीम शेख (29) व सलमा शेबू अन्सारी (32) या दोन महिला भारतीय चलनासारख्या हुबेहूब परंतु बनावट दिसणार्‍या 100 तसेच 200 च्या नोटा चलनात आणत असताना टिटवाळा पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली. यातील सना शेख ही कळवा तर सलमा अन्सारी ही कुर्ला येथील राहणारी आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.