Fri, Nov 16, 2018 05:28



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रुग्ण तरुणीच्या मृत्यूमुळे नातेवाइकांचा उद्रेक

रुग्ण तरुणीच्या मृत्यूमुळे नातेवाइकांचा उद्रेक

Published On: Jan 08 2018 1:27AM | Last Updated: Jan 08 2018 12:51AM

बुकमार्क करा




मुंबई : प्रतिनिधी

वयोवृद्ध, दुर्धर आजाराने ग्रस्तांना आधार केंद्रापर्यंत पोहोचणे शक्य नाही अशा नागरिकांसाठी आधार काढण्याचा त्रास वाचावा म्हणून घरी जावून कार्ड काढले जाणार आहे. यासाठी उपनगर जिल्हाधिकार्‍यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे.

आधारकार्ड अद्ययावत करणे, तपशिलात दुरुस्ती करणे या बाबींमध्ये अनेकदा नागरिकांचा बराचसा वेळ खर्ची पडतो. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दिव्यांग यांना आधारकार्ड काढण्यासाठी रांगेत उभे राहणे त्रासदायक ठरते. यावर उपाय म्हणून मुंबई तसेच उपनगर जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा आधार नोंदणी केंद्र सुरू केले आहे. मुंबई तसेच उपनगरात जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांच्या संकल्पनेनुसार उपनगर जिल्हा आणि बृहन्मुंबईसाठी उपयुक्त ठरेल असे जिल्हा आधार नोंदणी केंद्र बांद्रा येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सुरू करण्यात आले आहे.

केंद्रामध्ये 30 आधार नोंदणी संच ठेवण्यात आले आहेत. यापैकी काही संच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दिव्यांग यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या 30 संचाशिवाय अतिरिक्त 5 संच राखीव ठेवण्यात आले असून त्यांचा उपयोग वयोवृद्ध, दुर्धर आजाराने ग्रस्त किंवा आधार केंद्रापर्यंत पोहोचणे शक्य नाही अशा नागरिकांसाठी भरारी पथक संच म्हणून करण्यात येत आहे. हे केंद्र शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. याशिवाय नागरिकांच्या आधारसंबंधीच्या विविध स्वरुपाच्या तक्रारी, सूचनांसाठी www.aadharmumbaisuburban.com हे विशेष संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.