Wed, Aug 21, 2019 01:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाडजवळील दुचाकी अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू

महाडजवळील दुचाकी अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू

Published On: Mar 21 2018 9:29AM | Last Updated: Mar 21 2018 9:29AM   
महाड : पुढारी ऑनलाईन 
मुंबई -गोवा महामार्गावर महाडजवळ दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात एका शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला आहे. काल (मंगळवारी) रात्री आठच्या सुमारास महाडजवळील केंबुर्ली गावच्या हद्दीत ही घटना घडली. सुजाता रवींद्र सावंत (४५,रा काकरतळे उभा मारुती मंदिराजवळ,महाड ) असे मृत महिला शिक्षेकेचे नाव आहे. 

त्या पतीसोबत दुचाकीवरुन महाडच्या दिशेने येत असताना अचानक  म्हैस आडवी आल्यानंतर ब्रेक लावताच मागे बसलेल्या सुजाता सावंत यांचा तोल जाऊन त्या खाली रस्त्यावर पडल्या.  डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  

सावंत या महाडमधील केईएस मराठी माध्यम शाळेच्या शिक्षीका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या अपघाती निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सावंत दाम्पत्य आपल्या आंबेत या गावी गेले होते. तेथून परतत असताना ही दुर्घटना घडली. शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

Tag : Woman Teacher, Death In Accident, Mumbai Goa Highway, Mahad