Sun, Nov 18, 2018 23:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘...तर मी रस्त्यावर माझे जीवन संपवेन’ (Video)

‘...तर मी रस्त्यावर माझे जीवन संपवेन’ (Video)

Published On: Feb 05 2018 1:09PM | Last Updated: Feb 05 2018 1:09PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईतील एका महिलेने पती मानसिक आणि शारिरीक छळ करत असल्याची तक्रार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पती जाच करत असून त्याबाबतची तक्रार दिल्यानंतरही कोणतीच कारवाई पोलिसांनी केली नसल्याचा आरोप तीने व्हिडिओत केला आहे.   चित्रपट निर्माता असलेल्या अशोकी पंडित यांनी आपल्या ट्विटरवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

संबंधित महिलेने खार येथील घरामध्येच व्हिडिओ  रेकॉर्ड करुन मदत करण्याची, न्याय देण्याची मागणी केली आहे. व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘ माझ्या पतीने माझा मानसिक आणि शारिरीक छळ केला. गेल्या काही वर्षांपासून हा छळ सुरू आहे. मी माझ्या मुलांसाठी या नात्याला सांभळण्याचा प्रयत्न केला पण पतीने मात्र नेहमीच त्रास दिला. याबाबत पोलिसात तक्रार देऊनही पतीविरोधात कारवाई झाली नाही. आता मला तुम्हीच मदत करा. जर मला न्याय मिळाला नाही तर मी खारच्या रस्त्यावर उतरुन माझे जीवन संपवेन.’ 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ‘महिला खार  येथे एका दोन मजली  अपार्टमेंटमध्ये राहते. त्यांना तीन मुले असून महिला तीच्या मुलीसोबत वरच्या मजल्यावर राहते तर पती दोन मुलांसोबत राहतो. संबंधित महिलेचा आणि पतीचा घरगुती वाद आहे.’

या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.