Tue, Apr 23, 2019 13:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खोटे आरोप करणार्‍यांवर कारवाई का नाही : खडसे

खोटे आरोप करणार्‍यांवर कारवाई का नाही : खडसे

Published On: Mar 06 2018 5:05PM | Last Updated: Mar 06 2018 4:58PMमुंबई : प्रतिनिधी

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत आपल्या वेदना मांडल्या. आरोप झाले की, आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले जाते आहे. मात्र जे खोटे आरोप करतात त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. माझ्यावर एकापाठोपाठ आरोप झाले. मात्र एकाही आरोपात तथ्य निघाले नाही. माझ्या पीएने ३० कोटीची लाच घेतल्याचाही आरोप झाला, पण चौकशीत काहीच आढळले नाही. मागील दोन वर्षे मी चौकशीच्या फेऱ्यात अडकलो आहे. सीआयडी, एसीबी आणि आयटी, लोकायुक्त या सगळ्या चौकशा झाल्या, पण काहीही आढळलं नाही, असं सांगत खडसे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या वेदना विधानसभेत मांडल्या. हा सांगतानाच असे खोटे आरोप करणाऱ्या लोकांवर काय कारवाई करणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे अशी मागणी खडसे यांनी केली. 

खडसे यांनी मांडलेल्या या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी खोट्या तक्रारी करून बदनाम केले जात असल्याचे मान्य केले. तसंच काही लोक जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी करत असतील तर त्याचे काय करायचे याबाबत विधीमंडळाच्या समितीने निर्णय घ्यायला हवा अशी भूमिका मांडली.