Wed, Jun 26, 2019 03:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दुर्घटनेची जबाबदारी संध्याकाळपर्यंत निश्चित करा', मुख्यमंत्र्यांचे मनपाला आदेश(video)

'दुर्घटनेची जबाबदारी संध्याकाळपर्यंत निश्चित करा' (video)

Published On: Mar 15 2019 10:21AM | Last Updated: Mar 15 2019 12:29PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनलगत डी. एन. रोडवरून जाणार्‍या जुन्या पादचारी पुलाचा स्लॅब गुरुवारी रात्री ७.३० वाजता अचानक कोसळून ६ जण ठार तर,३४ जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यांनी सेंट जॉर्ज रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली. त्यांनी या घटनेचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. 

या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून संध्याकाळपर्यंत कारवाई करावी अशा सूचना पालिका आयुक्तांना दिल्या असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऑडिट होऊनही पूल कोसळणे ही गंभीर बाब असल्याचे फडणवीस म्हणाले. ज्या पुलांचे ऑडिट झाले आहे त्या पुलांची पुन्हा तपासणी व्हायला पाहिजे, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिला. 

फडणवीस यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी सेंट जॉर्ज रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.