Sat, Nov 17, 2018 14:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाळेत असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळांचीच

शाळेत असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळांचीच

Published On: Jun 03 2018 1:35AM | Last Updated: Jun 03 2018 1:22AMमुंबई : प्रतिनिधी

माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश व मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थी शाळेत असताना त्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही शाळेचीच राहील. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षापासून करणे सर्व शाळांना बंधनकारक  असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती दक्षता शिक्षण विभागाकडून घेण्यात येत आहे. शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या आवारात तसेच प्रवेशद्वारावर पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या तक्रारी दाखल करण्यासाठी आवश्यक व्यवस्था उभारावी, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. मात्र ज्या शाळा सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपायोजना करणार नाहीत, त्यांच्या विरोधात पालक, विद्यार्थ्यांकडून तक्रार आल्यास संबंधित शैक्षणिक संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे तावडे यांनी सांगितले. 

विद्यार्थी शाळेच्या परिसरात उपस्थितीत असताना त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी ही शाळांचीच राहील. शाळेच्या परिसरात कोणतीही अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शाळेतील मुलांच्या उपस्थिती संदर्भात सकाळी, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळेस संध्याकाळी हजेरी नोंदविण्यात यावी व अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे त्याची माहिती कळविण्यात यावी. 

विद्यार्थी मानसकि दबावाला बळी पडू नये म्हणून शाळेतच समुपदेशनाची व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.