होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आनंद कुठे मिळतो?; या चहावाल्याला विचारा... (viral Post)

आनंद कुठे मिळतो?; या चहावाल्याला विचारा (Viral)

Published On: Apr 28 2018 2:14PM | Last Updated: Apr 28 2018 2:15PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुंबईच्या रस्त्यावरील एक चहावाला...त्याचा रोजचा दिनक्रम ठरलेला...स्वत:चे आणि कुटुंबाचे दोनवेळचे पोट भरता येईल यासाठी त्याची धडपड... महिन्याची कमाई तुटपूंजीच...पण, अचानक त्याला महिनाभर कष्ट करून मिळणारे पैसे एकाच दिवसाच्या कमाईत मिळाले. रोजच्यापेक्षा ३० पट अधिक पैसे मिळाल्याने तो भारावून गेला. या पैशांतून त्याने एक स्वप्न पूर्ण केले. असे स्वप्न ज्यांने तुमचे डोळे पाणावतील...

कुटुंबियांसोबत वेळ घालवणे, मुलांसोबत फिरायला जाणे ही गोष्ट तुमच्यासाठी सामान्य असेल. मॉल, मॅकडॉनल्ड्स आणि कॅफेजमध्ये जाऊन फास्टफुड खाणे या गोष्ट अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनल्या आहेत. पण, हीच दैनंदीन गोष्ट एका चहावाल्याचे स्वप्न असू शकते. तो रोज चहा विकताना, घरी जाता येता एखादे मॅकडॉनल्ड्सला पाहत असेल. त्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याचे तो स्वप्न पाहत असेल. बागेत येणारे पालक मुलांना खेळणी घेऊन देतात हे चित्र त्यालाही सत्यात उतरवायचे असेल. म्हणूनच त्याने त्या एका दिवसाच्या कमाईचा वापर मुलांसोबत वेळ घालवण्यात आणि त्यांना मॅकडॉनल्ड्सला घेऊन जाण्यासाठी केला. त्याने त्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर शोधला.

एका हॉटेलच्या शेजारी मी माझा चहाचा गाडा लावतो. एका दिवशी त्या हॉटेलमध्ये एक कार्यक्रम होता. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर प्रत्येकाने माझ्याकडे चहा पिला. त्यामुळे माझी कमाई चांगली झाली. महिनाभर मेहनत केल्यानंतर मला जितके पैसे मिळतात तितके त्या एका दिवसाने मला दिले. यामुळे मी माझे स्वप्न पूर्ण केले. माझ्या पत्नी आणि मुलांसोबत मी मॅक्डॉनल्डसला गेलो. तिथे मुलांना हवे ते खायला दिले. खेळणी घेऊन दिली. या माझ्या एका दिवसाच्या ट्रीटमुळे मी मुलांच्या नजरेत हिरो झालो, असे त्या चहावाल्याने म्हटले. 

मी माझ्या पत्नी आणि मुलांना घेऊन पहिल्यांदाच असे फिरायला घेऊन गेलो होतो. मी त्यांना बर्गर खायला घातला. माझी मुले खूप आशेने माझ्याकडे पाहत होती. त्यांच्या नजरेत मी एक हिरो झालो होतो. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी आणि कायम स्मरणात राहणारा दिवस होता, असे या चहावाल्याने म्हटले. 

या चहावाल्याची ही पोस्ट Humans of Bombay या फेसबुकवर पेजवरून व्हायरल होत आहे. त्याला आत्तापर्यंत ३९ हजारपेक्षाही अधिक लोकांनी लाईक आणि ४ हजार पाचशे लोकांनी शेअर केले आहे. तर ९०० पेक्षाही अधिक लोकांनी त्यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत..

Tags : Happyness, Chaiwala, Tea seller, McDonald's, Childrens, Dream