Tue, Sep 17, 2019 22:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिग्नल बिघाडामुळे परेचा लेटमार्क

सिग्नल बिघाडामुळे परेचा लेटमार्क

Published On: May 23 2019 1:42AM | Last Updated: May 23 2019 1:44AM
मुंबई : प्रतिनिधी

गोरेगाव आणि जोगेश्‍वरी रेल्वे स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे पश्‍चिम रेल्वेवरील प्रवाशांना बुधवारी सकाळपासून मनस्तापाला सामोरे जावे लागले. अवघ्या 20 मिनिटांत बिघाड दुरूस्त केल्यानंतरही सायंकाळी 4 वाजेपर्यंत परेवरील तब्बल 50 फेर्‍या रद्द करण्यात आल्या. याशिवाय 150 लोकलला लेटमार्क सहन करावा लागला.

दरम्यान, सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने परेचा पुरता बोजवारा उडाला होता. जोगेश्‍वरी आणि गोरेगाव रेल्वेस्थानकांदरम्यान झालेल्या या बिघाडामुळे भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेर चार ते पाच लोकल सलग रांगेत उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यात रेल्वे प्रशासनाकडून उद्घोषणा होत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याउलट सकाळी 7.51 वाजता ट्वीटरवरून रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बिघाडाची माहिती प्रवाशांना दिली होती. मात्र त्याऐवजी उद्घोषणा आणि मोबाईल एसएमएसद्वारे प्रवाशांना माहिती दिली असती, तर पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करता आली असती, अशा प्रतिक्रिया संतप्त प्रवाशांमधून व्यक्त करण्यात आल्या. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex