Thu, Jun 27, 2019 12:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परे, हार्बर विस्कळीत!

परे, हार्बर विस्कळीत!

Published On: Dec 22 2017 1:28AM | Last Updated: Dec 22 2017 1:28AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

पश्‍चिम रेल्वेच्या अंधेरी व जोगेश्‍वरी स्थानकांच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने गुरुवारी सकाळी चर्चगेटच्या दिशेने जाणारी अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी लोकल सेवा 20 मिनिटे उशिराने धावल्याने कामावर निघालेले प्रवासी मात्र पुरते हैराण झाले. तसेच खांदेश्वर आणि मानसरोवरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर, ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दोन्ही दिशेने जाणार्‍या लोकल सेवेवर यामुळे परिणाम झाला आहे. बिघाडामुळे लोकल सेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने धावल्या. 

अंधेरी व जोगेश्वरी या स्थानकांदरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी बुधवारी रात्री पश्चिम रेल्वेने ब्लॉक जाहीर केला. मात्र, हे काम वेळेत न संपल्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच लोकल सेवा उशिराने धावत होत्या.