होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई: लोकलच्या धडकेत चौघांचा मृत्यू

मुंबई: लोकलच्या धडकेत चौघांचा मृत्यू

Published On: May 14 2018 4:29PM | Last Updated: May 14 2018 4:29PMठाणे : प्रतिनिधी

पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते कांदीवली स्टेशनदरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातात मृत्यू झालेले चौघेही कणकवलीहून मुंबईतील घरी परतत होते. त्यावेळी रेल्वे रूळ ओलांडताना ट्रेनची धडक लागून चौघांचा मृत्यू झाला. 

सागर संपत चव्हाण (23), साईप्रसाद मनोहर चव्हाण ( 17 ), मनोज दीपक चव्हाण (17 ), दत्तप्रसाद मनोहर चव्हाण (20) अशी मृतांची नावे आहेत. या चौघांपैकी सागर हा कांदिवलीला राहणारा होता तर इतर तिघे कणकवलीचे रहिवासी होते. सोमवारी सकाळी सागरच्या घरी जाण्यासाठी सगळे निघाले होते. त्यावेळी बोरिवलीला ट्रेनने जाताना कांदिवली जवळ सिग्नला लोकल थांबली. यावेळी तिघांची ट्रेनमधून उड्या मारल्या. ट्रॅक ओलांडत असताना चर्चगेटहून येणाऱ्या लोकलची धडक या चौघांना बसली आणि त्यांचा मृत्यू झाला असून घटनेची लोहमार्ग पोलिसांनी पंचनामा सुरू असल्याची माहिती बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.