Fri, Apr 26, 2019 09:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 10 2017 12:52AM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

एका 22 वर्षीय तरुणीला एका बदमाशाने लग्नाचे आमिष दाखवून तिचे नग्न अवस्थेत फोटो काढत ते आई-वडिलांना दाखवू, अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा बदमाश हाती लागला नसून मानपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सूरज डोईफोडे असे या बदमाशाचे नाव आहे. या घटनेतील तरुणी डोंबिवली परिसरात राहते.

आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून मोबाईलद्वारे तिचे नग्न फोटो काढले. हेच फोटो तिच्या आई-वडिलांना दाखवून तिला बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणी असहाय्य झाली. त्याचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मानपाडा पोलीस  ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.