Sun, Mar 24, 2019 23:47
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वेबसाईट हॅक : 33 लाखांची फसवणूक

वेबसाईट हॅक : 33 लाखांची फसवणूक

Published On: Aug 15 2018 11:59PM | Last Updated: Aug 15 2018 11:24PMमुंबई : प्रतिनिधी

फ्रॉड ट्रान्झेक्शनद्वारे अकबर ट्रॅव्हल्स कंपनीची अज्ञात व्यक्तीने सुमारे 33 लाख रुपयांची फसवणुक केली. कंपनीची अधिकृत वेबसाईट हॅक करुन ही फसवणुक झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. 

पायधुनीतील जंजीकर स्ट्रिटवर अकबर ट्रॅव्हल्स या कंपनीचे एक कार्यालय असून या कंपनीत परब पॉलि कुनियू जोसेफ हे कामाला आहेत. या कंपनीद्वारा देश-विदेशातील टुर्सचे आयोजन होत असून त्यासाठी कंपनीची एक अधिकृत वेबसाईट आहे. कंपनीचे काही व्यवहार वेबसाईटच्या माध्यमातून होतात. जुलै महिन्याच्या 20 आणि 21 तारखेला काही अज्ञात व्यक्तीनी कंपनीची वेबसाईट हॅक करुन फ्रॉड ट्रॉन्झेक्शन करुन सुमारे 33 लाख रुपयांचा व्यवहार केला होता. 

या व्यवहारातील रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता इतरत्र वळविण्यात आली होती. प्राथमिक तपासात वेबसाईटच्या पोर्टलद्वारे लाखो रुपयांच्या विमानाची तिकिट, हॉटेल, बसचे बुकींग करण्यात आले होते. हा प्रकार कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी पायधुनी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मंगळवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. गुन्ह्यांतील आरोपींचा पायधुनी पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी शोध घेत आहेत.