Fri, Sep 21, 2018 00:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत कुर्बानीचा रेडा पिसाळला अन्‌...(Video)

भिवंडीत कुर्बानीचा रेडा पिसाळला अन्‌...(Video)

Published On: Aug 23 2018 12:28PM | Last Updated: Aug 23 2018 11:58AMभिवंडी : प्रतिनिधी

काल सर्वत्र बकरी इद सर्वत्र उत्साहाने साजरी करण्यात आली होती. भिवंडीत कुर्बानीसाठी आणलेला रेडा पिसाळल्याने मोठी धावपळ उडाली. तसेच रेड्याने गळ्यातील दावण तोडून रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, इदनिमित्त कुर्बानीसाठी भिवडीतील मोहल्ला परिसरात रेडा आणला होता. त्यावेळी मालकाच्या ताब्यातून निसटलेल्या रेड्याने परिसरात धुमाकूळ घातला. रस्त्याशेजारी उभा असलेल्या गाड्यांना धडक दिल्याने मोठे नुकसान झाले. रेडा रस्त्यावर वाहनांची तोडफोड करताना नागरिकांनी दूर राहणेच पसंत केले. 

या घटनेची माहिती भोईवाडा पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी स्थानिकांच्या मदतीने रेड्याला पकडले.  त्याला भिवंडी तालुक्यातील महापोली परिसरात असलेल्या तब्येल्यात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान रेड्याने केलेल्या तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.