Wed, Jul 08, 2020 06:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

मुंबई : मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

Last Updated: May 29 2020 8:13AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

पश्चिम-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील ४८ तास कायम राहणार असून त्यानंतर पुढील तीन दिवसांत तो ओमान आणि येमेनच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे.  त्यामुळे मच्छिमारांनी येत्या काही दिवसांसाठी समुद्रापासून दूर रहावे, आजपासून पुढचे काही दिवस अरबी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाबरोबरच पृथ्वी-विज्ञान मंत्रालयाने दिला आहे.

 सोशल मीडियावर निर्बंध!

दरम्यान, १ जूनला मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळमधून मान्सून दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.