Wed, Jul 24, 2019 12:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शक्तिप्रदर्शनाने सेनेकडून वनगांचा अर्ज दाखल

शक्तिप्रदर्शनाने सेनेकडून वनगांचा अर्ज दाखल

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 09 2018 1:34AMबोईसर : वार्ताहर

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे जोरदार शक्ति प्रदर्शन  करून श्रीनिवास चिंतामण वनगा यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी (काल) दाखल करण्यात आला. वनगांची उमेदवारी, शिवसेनेचे शक्ति प्रदर्शन, माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गावित यांचा भाजप प्रवेश यामुळे जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 3 आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) आपली भूमिका अद्यापि जाहीर न केल्याने बविआच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंगळवारी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक, खासदार राजन विचारे, डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर, संपर्क महिला संघटक ममता चेंबूरकर, दीपा पाटील, भारती गावकर, शांताराम मोरे, रूपेश म्हात्रे, अमित घोडा. नवीमुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेत विजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीनिवास वनगा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी पालघरच्या हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करून शिवसेनेने प्रचंड लवाजम्यासह रॅली काढून जोरदार शक्ति प्रदर्शन केले. 

यावेळी श्रीनिवास वनगा यांचे समर्थक तसेच सह संपर्क प्रमुख केतन पाटील, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, प्रकाश पाटील, नरेश म्हस्के, ज्योती मेहेर, वैष्णवी राहणे, उपजिल्हाप्रमुख राजेश कुट्टी, सुनील पाटील, राजा जाधव, संतोष शेट्टी तसेच तालुका प्रमुख, महिला आघाडी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सरपंच, सदस्य उपस्थित होते. पालघर, विक्रमगड, डहाणू, वसई, नालासोपारा, बोईसर या सहाही विधानसभा क्षेत्रातून सुमारे 50 हजार शिवसैनिक मिरवणुकीत सामील झाले. यामुळे भाजपच्या तंबूत घबराट पसरली आहे.

Tags : Mumbai, mumbai news, Wanga, application, filed,