Sat, Jul 20, 2019 12:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माटुंग्यात भटक्या मांजरांना मच्छीमार्केटचा आसरा!

माटुंग्यात भटक्या मांजरांना मच्छीमार्केटचा आसरा!

Published On: Aug 05 2018 1:43AM | Last Updated: Aug 05 2018 1:13AMमाटुंगा : कांचन जांबोटी

मांजरांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्याचा पालिकेने निर्णय घेतला असून, कुत्र्यांप्रमाणे भटक्या मांजरांचीही नसबंदी करण्यात येणार आहे. परंतु सध्या मुंबईतील भटक्या मांजरांना निवारा नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. माटुंग्यातील  सिटीलाईट विभागात तर जवळपास 100 मांजरांनी गोपी टँक मच्छी मार्केटचा आसरा घेतला आहे.

येथे नागरिक भटकी मांजरे सोडून जातात. त्यानंतर कुणीही लक्ष देत नसल्याने त्यांची देखभाल आपणच करत असल्याचे मार्केटमधील मच्छी विक्रेत्या महिलांनी सांगितले. त्याच मांजरांना खाण्यासाठी मासे देतात. मार्केट परिसरात त्यांचा नेहमीचा वावर असतो. मार्केट आवारात घाण करत असल्याने साफसफाई करण्याची वेळ विक्रेत्यांवरच येते.

दिवसेंदिवस मांजरांची संख्या वाढतच चालली असल्याने पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी मच्छी विक्रेत्यांनी केली आहे.  मांजरांच्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी पालिकेचेे कोणतेही नियम नाहीत. त्यामुळे  लवकरच याबाबत नियमावली करण्यात येणार आहे. अनेकदा प्राणिमित्र मासळी विकत घेऊन मांजरांना देतात. डॉक्टर देखील तपासणी करून जातात. परंतु त्यांची राहण्याची व्यवस्था कुणीच करत नसल्याने मच्छी विक्रेत्यांनी खंत व्यक्‍त केली. त्यामुळे पालिकेने भटक्या मांजरांच्या निवार्‍याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.