Tue, Sep 17, 2019 22:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वामन भोसले,परेश रावल यांना राज कपूर पुरस्कार

वामन भोसले,परेश रावल यांना राज कपूर पुरस्कार

Published On: May 26 2019 1:45AM | Last Updated: May 26 2019 1:45AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शिका सुषमा शिरोमणी आणि अभिनेता भरत जाधव यांना घोषित झाला आहे. राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले आणि अभिनेता परेश रावल यांना घोषित करण्यात आला आहे.

56 वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया येथे सायंकाळी 6.30 वाजता आयोजिला आहे. या सोहळ्याला ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. याच सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी पुरस्कारांची घोषणा केली. मराठी आणि हिंदी चित्रपटक्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे, तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राज कपूर जीवनगौरव व राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जीवनगौरव पुरस्कार 5 लाख रुपयांचा तर विशेष योगदान पुरस्कार 3 लाख रुपयांचा आहे.