Mon, Aug 26, 2019 08:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकसभा रणांगण LIVE : राज्यातील १० मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५५.३७ टक्के मतदान

लोकसभा रणांगण LIVE : राज्यातील १० मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५५.३७ टक्के मतदान

Published On: Apr 18 2019 7:49AM | Last Updated: Apr 18 2019 4:06PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील १२ राज्यांमधील ९५ मतदार संघांत आज, गुरुवारी (दि. १८) मतदान होत आहे. दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील एकूण दहा जागांचा समावेश आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहर या मतदारसंघांत मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे.

सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण हे दोन माजी मुख्यमंत्री अनुक्रमे सोलापूर आणि नांदेड मतदारसंघातून उभे आहेत. गेल्यावेळी मोदी लाटेतही नांदेड अजिंक्य ठेवण्याचा करिष्मा अशोक चव्हाण यांनी करून दाखविला होता. त्यामुळे यशाची पुनरावृत्ती होण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे. तर सोलापुरात शिंदे यांच्यापुढे वंचित बहुजनच्या प्रकाश आंबेडकर यांनी व भाजपा उमेदवाराने आव्हान उभे केले आहे.

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आज सकाळी सोलापुरात आपल्या कुटुंबियासमवेत जात  मतदानाचा हक्क बजावला.

 

लोकसभा रणांगण LIVE UPDATE :  राज्यातील १० मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५५.३७ टक्के मतदान 

राज्यात ३ वाजेपर्यंत सरासरी ४६ टक्के मतदान 

राज्यात दुपारी एकपर्यंत ३५.४० टक्के मतदान 

बुलडाणा  - 34.43%

अकोला - 34.46%

अमरावती - 33.68%

हिंगोली - 37.44%

नांदेड - 38.19%

परभणी - 37.95%

बीड - 34.65%

उस्मानाबाद - 34.94%

लातूर - 36.82%

सोलापूर - 31.56%

सरासरी मतदान - 35.40%

दुपारी १ पर्यंत परभणीत ३५.४१ टक्के, हिंगोलीत ३४.०१ टक्के, लातूर ३३.१२ टक्के, नांदेड ३७ टक्के, सोलापूरमध्ये ३१ टक्के, बीडमध्ये ३४.४२ टक्के मतदान. 

परळी वैजनाथ : नाथरा येथे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले मतदान 

राष्ट्रवादी चे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांनी आपल्या वडिलांसोबत केले मतदान

- उस्मानाबाद मध्ये हिरीरिने मतदान केलेले नागरिक.

परभणीत मतदान उत्साहात...

- सोलापूरमध्ये सकाळी ११ पर्यंत १९ टक्के, बीडमध्ये १८.३९ टक्के, हिंगोलीत २०.४० टक्के, बुलडाणा २०.५२ टक्के, नांदेडमध्ये २४.०६ टक्के मतदान

-  नांदेडमध्ये सकाळी ९ पर्यंत ७.४७ टक्के मतदान

- परभणीत सकाळी ९ पर्यंत ९.३० टक्के मतदान

- सोलापूरमध्ये सकाळी ९ पर्यंत ६.८७ टक्के मतदान

- लातूरमध्ये सकाळी ९ पर्यंत ८.४१ टक्के मतदान

- बुलडाणा जिल्ह्यातील एका नवऱ्या मुलाने आपल्या लग्नाआधी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.  


- अकोल्यात संजय धोत्रे यांनी केले मतदान
- सोलापूर : मोहोळमधील २४७ बुथ क्रमांक १७७ वर तब्बल अर्धा तास इव्हीएम मशीन बंद पडले 
- काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात आपल्या कुटुंबियासमवेत जात बजावला मतदानाचा हक्क.