वोडा-आयडियाचे मोफत कॉल जाहीर

Last Updated: Oct 11 2019 1:58AM
Responsive image

Responsive image

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा

रिलायन्स जिओने जिओबाहेरच्या अन्य दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईलवर संपर्क साधल्यास त्याचे आंतरजोडणी शुल्क आकारण्याची घोषणा केली. मात्र, जिओची घोषणा झाल्यानंतर लगेचच वोडाफोन-आयडियाने आपण आपल्या नेटवर्कवरून बाहेरच्या दूरसंचार कंपन्यांशी संपर्क साधला तरी असे कोणतेही शुल्क आकारून ग्राहकांना त्रास देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. 

आपल्या भूमिकेसंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना वोडाफोन-आयडियाने ग्राहकांना फोन करताना त्याचे कोणत्या कंपनीचे नेटवर्क आहे याच्याशी काही देणे-घेणे नसते, तर त्यांना फक्त संपर्क साधणे महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या ग्राहकांवर आर्थिक बोजा टाकणार नसल्याचे विशद केले आहे. तसेच, कंपनीकडून प्रीपेड असो वा पोस्टपेड ग्राहक, त्यांच्यावर बाहेरच्या नेटवर्कशी संपर्क साधल्यास शुल्क आकारण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. 

आंतरजोडणी हा कंपन्यांचा आपापसातील व्यवहार
नेटवर्कमधील आंतरजोडणी संपर्क ही कंपन्यांची आपापसातील व्यावसायिक तडजोड असून त्याचा ग्राहकांशी कोणताही संबंध नाही. तसेच, आंतरजोडणी कॉल्सवर शुल्क आकारण्याचा एका कंपनीने घेतलेला निर्णय ही घाईत केलेली कृती असून ती वस्तुस्थिती दडविणारी आहे.  हा विषय ट्रायच्या अखत्यारित असून त्यांनी याबाबत बैठक घेऊन परिस्थिती पूर्ववत केली पाहिजे अशी आपल्या कंपनीची भूमिका असल्याचेही वोडाफोन-आयडियाने स्पष्ट केले आहे. तसेच, ट्रायने घालून दिलेल्या दंडकानुसार आंतरजोडणी कॉल्स ही संबंधित कंपन्यांच्या आपापसातील व्यावसायिक संबंधांशी  संबंधित असून त्याचा शुल्क वा अन्य कोणत्याही कारणांनी ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध येण्याचा प्रश्नही उद्भवत नसल्याचे कंपनीने सांगितले आहे.  

ग्राहकांनो, अन्लिमिटेडचा आनंद घ्या!
ग्राहकांनो तुम्ही कोणत्याही नेटवर्कमध्ये कॉल करा तुम्हाला कोणताही भुर्दंड बसणार नाही, अन्लिमिटेडचा मनमुराद आनंद घ्या, या आशयाचे ट्वीट वोडाफोन-आयडियाने  केले आहे. रिलायन्स जिओने अन्य नेटवर्कसाठी 6 पैसे प्रतिमिनिट शुल्क आकारणी सुरु केल्यानंतर या कंपनीने आपल्या ग्राहकांना दिलासा देत अन्य ग्राहक वळवण्याचा यानिमित्ताने प्रयत्न केला आहे. वोडाफोन-आयडियाचे प्लान्स 119 रुपयांपासून सुरू होतात. त्यात 28 दिवसांसाठी अमर्यादित लोकल आणि एसटीडीसह 1 जीबी डेटा मिळतो.   स्‍ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवा : धनंजय मुंडेंची मागणी


अमेरिकेमध्ये जाण्याचा ३२५ भारतीयांचा प्रयत्न फसला; मेक्सिकोतून पाठवले परत 


कोल्हापूर : ऋतुराज पाटलांच्या प्रचारासाठी ज्योतिरादित्य शिंदेंचा मराठीतून संवाद  


रंजन गोगोई यांच्‍या निवृत्तीनंतर मराठी माणूस होणार सरन्यायाधीश?


पीएमसी बँक खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाही


KBC 11: ' १५ वर्षांची होते, तेव्हा ८ लोकांनी केला बलात्‍कार' ​​​​​​​


स्पृहाच्या या लुकमधील 'विक्की वेलिंगकर'चे नवे पोस्टर 


'या' हॉलिवूड अभिनेत्रीने ऋतिकचा उचलला नाही फोन 


कोल्‍हापूर : बनावट नोटांची छपाई; तिघांना अटक 


प्रफुल्ल पटेल चौकशीसाठी ईडीसमोर हजर