Thu, Apr 25, 2019 08:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुमारी मातेच्या मुलाला बापाच्या नावाशिवाय जन्मदाखला द्या 

कुमारी मातेच्या मुलाला बापाच्या नावाशिवाय जन्मदाखला द्या 

Published On: Mar 14 2018 1:32AM | Last Updated: Mar 14 2018 1:25AMमुंबई : प्रतिनिधी 

त्या कुमारी मातेच्या मुलाला त्याच्या जैविक पित्याचे नाव वगळून नव्याने जन्म दाखला द्या, असा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिला. कुमारी मातेने जन्माला घातलेल्या मुलीच्या जन्म दाखल्यावर जैविक पित्याच्या नावाची सक्ती करण्याच्या पालिकेच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभस ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने वडिलांच्या नावाचा कॉलम  रिकामा ठेवून  नव्याने दाखल द्या तसेच यापूर्वी देण्यात आलेल्या जन्म दाखल्याच्या प्रती परत मागून घ्या असेही पालिकेला बजावले.

एका कुमारी मातेच्या प्रसुतीच्यावेळी त्या बाळाच्या 20 वर्षाच्या जैविक पित्याचे नोदविण्यात आलेले नाव वगळण्यास परवानगी द्या अशी विनवणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे जैविक पित्याने न्यायालयात हजर राहून स्वत:चे नाव जन्म दाखल्यावरून काढून टाकण्यास हरकत नसल्याचे लेखी हमीपत्र सादर केल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.