Wed, Mar 20, 2019 08:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्नास नकार; तरुणीचे अश्‍लील फोटो केले व्हायरल

लग्नास नकार; तरुणीचे अश्‍लील फोटो केले व्हायरल

Published On: Dec 19 2017 2:03AM | Last Updated: Dec 19 2017 1:32AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

विवाहास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या नावाने बनावट फेसबूक अकौट उघडून तिचे अश्‍लिल फोटो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. 

मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरातील एका क्‍लिनिकमध्ये काम करत असलेल्या 28 वर्षीय तरुणीची काही महिन्यांपूर्वीच क्‍लिनीकमध्ये आलेल्या नितीन वर्मा नावाच्या तरुणासोबत ओळख झाली. ओळखिचे रुपांतर मैत्रीमध्ये झाल्यानंतर दोघांमध्ये फेसबूक, व्हॉटसअ‍ॅप अशा सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद सुरू झाला. तरुणीला आर्कषित करण्यासाठी वर्मा याने त्याच्या वडिलांचा हिर्‍यांचा व्यवसाय असल्याचे सांगितले. मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर वर्मा याने तरुणीला विवाहासाठी मागणी घातली. तरुणीने वर्माबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली असता तो एक बेरोजगार तरुण असल्याची धक्कादायक बाब तिला समजली. तीने त्याला नकार कळवला. याच रागातून वर्माने तरुणीच्या नावाने बनावट फेसबूक अकाऊंट बनवून त्यावर अश्‍लिल मॅसेज आणि तिचे अश्‍लिल फोटो व्हायरल केले. हा प्रकार समजताच तरुणीने रविवारी सायंकाळी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.