होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दिल बहलता है मेरा...;गोविंदाला मागे टाकणारे डान्सर काका! (Video)

दिल बहलता है मेरा...; गोविंदाला मागे टाकणारे अफलातून काका! (Video)

Published On: Jun 01 2018 11:25AM | Last Updated: Jun 01 2018 11:25AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

डान्सच्या शौकीनांना काळ-वेळ आणि वयाच भान नसतं हेच खरं. आजकाल कोणत्याही कार्यक्रमात DJ असतोच. DJ चा ‘धांगड धिंगा’ कानावर पडला की तुमचे पायही आपोआप थिरकायला लागतात. यातच जर गाणं गोविंदाचं असलं तर विचारायलाच नको.

आताच्या ‘बादशाहो’ आणि ‘हनी सिंग’च्या गाण्यांनाही मागं टाकणारं  गोविंदाचं 'खुदगर्ज' (1987) चित्रपटातलं 'दिल बहलता है मेरा.. आपके आ जाने से' हे गाणं आजही अनेकांना नाचायला भाग पाडतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ५० पार केलेले एक काका गोविंदापेक्षाही भारी नाचत आहेत. या काकांचा हा ‘जलवा’ पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातली. या ‘व्हायरल गोविंदा’सोबत त्यांची पत्नीही स्टेजवर दिसत आहे. 

काही दिवसांपासून परदेशातील एका आजी-आजोबांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ पाहून अनेकांनी म्हटले होते की, भारतातील वृद्ध उत्साही नसतात. पण, आता या काकांचा हा व्हिडिओ पाहून ‘हम भी किसी से कम नही’ असेच म्हणावं लागेल.