Thu, Feb 21, 2019 01:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विजयाने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

विजयाने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

Published On: Dec 22 2017 1:28AM | Last Updated: Dec 22 2017 12:45AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

शिक्षिकेने 500 उठाबशा काढण्याची शिक्षा दिलेल्या विजया चौगुले हिची प्रकृती आता ठणठणीत असून गुरुवारी तिने मुंबईतील विविध पर्यटन स्थळांना भेट दिली. शुक्रवारी सायंकाळी ती कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील आपल्या गावी परतणार आहे. बुधवारी सायंकाळी गेट वे ऑफ इंडिया येथे त्यानंतर गुरुवारी दिवसभर मुंबई दर्शन घडविण्यात आले. तारापूर मस्त्यालय, त्यानंतर नेहरु तारांगण, राणीची बाग पाहून नंतर तिने सिद्धिविनायक दर्शनही घेतले.