Mon, Jan 21, 2019 17:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विजयाला डिस्चार्ज, आज करणार मुंबई दर्शन 

विजयाला डिस्चार्ज, आज करणार मुंबई दर्शन 

Published On: Dec 21 2017 2:10AM | Last Updated: Dec 21 2017 1:27AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

शिक्षिकेने 500 उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्यामुळे अत्यवस्थ झालेल्या विजया चौगुलेला केईएम रुग्णालयातून बुधवारी डिस्चार्ज मिळाला. विजया स्वत:च्या पायाने हळूहळू चालत रुग्णालयातून बाहेर पडली. कोल्हापूरनंतर मुंबईत उपचार झालेल्या विजयाच्या चेहर्‍यावर रुग्णालय सोडताना हास्य फुलले. सायंकाळी ती गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचली. तर उद्या (गुरुवारी) केईएम, रुग्णसेवक आणि आईवडिलांच्या सोबत मुंबई दर्शन करणार आहे.

न्यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे विजयावरील उपचार शक्य झाले. औषधांसह न्यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या मदतीने तिचे समुपदेशनसुद्धा करण्यात आले. उपचारासाठी दाखल करतेवेळी ती पूर्णपणे भेदरलेली होती. मेंदू संबंधित व काही स्नायूंच्या तपासण्या करून उपचार करण्यात आले. विजयाला मुख्याध्यापिकने शिक्षा दिल्याचा हा विषय हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये गाजला. त्याचबरोबर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही या प्रकरणी तातडीने दखल घेवून विजयावर मुंबईत उपचार करण्याचे आदेश दिले होते.