Tue, Mar 19, 2019 16:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा दिग्दर्शक गजाआड

‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा दिग्दर्शक गजाआड

Published On: Aug 03 2018 3:05PM | Last Updated: Aug 03 2018 6:21PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

जीएसटीमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक करण्यात आली आहे. दिग्दर्शक विजय गुट्टेला  याच्यावर ३४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याला जीएसटी इंटेलिजन्सने मुंबतून अटक केली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या 132(1)(सी) नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विजय गुट्टे याच्या मालकीची व्हीआरजी डिजिटल कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीने 34 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी बिलांमध्ये फेरफार करुन घोटाळा केला असल्याचे समजते. व्हीआरजी या कंपनीने ॲनिमेशन आणि इतर कामासाठीची बिले दुसऱ्या एका कंपनीची दाखवली आहेत. ही बिले खोटी असल्याचा आरोप गुट्टेवर आहे. ज्या कंपनीकडून ही बिले घेण्यात आली आहेत त्यांच्यावर यापूर्वी १७० कोटींचा घोटाळ्याचा आरोप आहे.

याप्रकरणी दिग्दर्शक विजय गुट्टेला अटक करण्यात आली आहे. त्याची रवानगी ऑर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. गुट्टेला १४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये अनुपम खेर यांनी मनमोहन सिंग यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.