Thu, May 23, 2019 04:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपची कोकणात 'अशी' फिल्डिंग!

शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपची कोकणात 'अशी' फिल्डिंग!

Published On: May 02 2018 9:29AM | Last Updated: May 02 2018 9:29AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

शिवसेनेचे कोकणातील वाढते बळ रोखण्यासाठी भाजपने आतापासानूच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून या रणनितीचा एक भाग म्हणून नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला कोकण विधान परिषदेची एक जागा सोडली आहे.

नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने चांगले यश मिळविले आहे. कोकणात राणेच शिवसेनेला टक्कर देऊ शकतात, असे हेरुन भाजपने राणेंना बळ देण्यास सुरुवात केली आहे.

भाजपने कोकण विधान परिषदेची जागा लढवित नसल्याचे स्पष्ट करत राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाला सोडण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे कोकणात शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अशी तिरंगी लढत रंगणार आहे. शिवसेनेने राजीव साबळे यांना तर सुनील तटकरेंना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा राष्ट्रवादीचा विचार आहे. त्यांना जादा ताकद मिळावी यासाठी त्यांच्या कुटुंबीयांपैकीच एखादा सदस्य ही निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. सध्या विधान परिषदेच्या 78 जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 23 आमदार आहेत. तर काँग्रेसचे 19, भाजप 18, शिवसेना 9, अपक्ष 6, लोकभारती 1 आणि इतर 2 असे आमदार आहेत.

Tags : Vidhan Parishad Elections, Maharashtra Swabhimaan Paksh, BJP