Thu, Apr 25, 2019 12:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपचा विजय धक्कादायक; EVMबाबत शंका : राष्ट्रवादी

भाजपचा विजय धक्कादायक; EVMबाबत शंका : राष्ट्रवादी

Published On: May 15 2018 4:14PM | Last Updated: May 15 2018 4:17PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

कर्नाटकमध्ये काँग्रेसची परिस्थिती चांगली होती. तिथले लोक काँग्रेसबाबत नकारात्मक नव्हते, त्यामुळे काँग्रेसचा विजय निश्चित होता. मात्र भाजपचा एवढा मोठा विजय होतो यावर विश्वास बसत नाही. लोकांच्या मनात जे होते आणि खऱ्या परिस्थितीत सुसंगती नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर त्यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली.

मतांचे विभाजन झाल्याने भाजपला फायदा झाला असे म्हटले जात आहे. मात्र, ज्या ठिकाणी भाजपची अवस्था बिकट होती तिथेदेखील त्यांचा उमेदवार निवडून येत असल्यास EVMबाबत शंका येत असल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने मतविभाजन टाळले तर भाजपला रोखणे शक्य आहे. त्याचबरोबर कनर्तटकात निजदला पाठिंबा देण्याचा चांगला निर्णय असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवर म्हटले आहे. 

No automatic alt text available.

कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांपैकी भाजपने १०४ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने ७८ अधिक जागी आणि निजद ३७ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवान राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेसने निजदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष असल्याने सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

Tags : Karnataka, Election, Result, BJP, Congress, NCP, Reaction